कधी सुरू करता शिवणकला? -भाग ४
नमस्कार मैत्रिणींनो ," कधी सुरू करता शिवणकला ?" ह्याचे आधी चे ३ भाग तुम्ही वाचले असतील. जर नसेल तर पुन्हा एकदा लिंक देते आहे. https://mugdharane.blogspot.com/2022/07/blog-post.html https://mugdharane.blogspot.com/2022/08/blog-post_9.html https://mugdharane.blogspot.com/2022/12/blog-post.html जसं , मी आधीच्या ३ भागात लिहीलंय,की माझ्या काही मैत्रिणींना शिवणकाम करण्यासाठी अडथळे आले, आणि त्यावर मात करण्यासाठी मी काय मदत करु शकते, त्यासंबंधी हा ४था आणि शेवटचा blog... २) मी पण शिवण क्लास केलाय... पण घरी मशीन नव्हतं , म्हणून पुढे काही करता आलं नाही. खरं आहे, कधी कधी आपण resourceful नसतो, त्यामुळे आपण जे शिकलो त्याचा सराव, वापर करू शकत नाही. पण तुम्हाला मनापासून इच्छा असल्यास तुम्ही पुन्हा नव्याने शिवणकला शिकू शकता. जसं मी पहिल्या ब्लॉग मध्ये लिहीलंय की शिवणकाम कोणत्याही वयात सुरू करु शकतो. सध्या शिकण्यासाठी अनेक साधनं उपलब्ध आहेत, तर नक्की विचार करा. ३ ) मी घरी मशीन होतं.... म्हणून मी शिवण क्लास केला,पण नंतर सराव केला नाही. खरं आहे, कधी कधी शालेय शिक्षण - कॉलेज शिक्षण - नोकरी ...