कधी सुरू करता शिवणकला? -भाग ४

 

नमस्कार मैत्रिणींनो ,"कधी सुरू करता शिवणकला?" ह्याचे आधी चे ३ भाग तुम्ही वाचले असतील. जर नसेल तर पुन्हा एकदा लिंक देते आहे.

https://mugdharane.blogspot.com/2022/07/blog-post.html

https://mugdharane.blogspot.com/2022/08/blog-post_9.html

https://mugdharane.blogspot.com/2022/12/blog-post.html

जसं , मी आधीच्या ३ भागात लिहीलंय,की माझ्या काही मैत्रिणींना शिवणकाम करण्यासाठी अडथळे आले, आणि त्यावर मात करण्यासाठी मी काय मदत करु शकते, त्यासंबंधी हा ४था आणि शेवटचा blog...

२) मी पण शिवण क्लास केलाय... पण घरी मशीन नव्हतं , म्हणून पुढे काही करता आलं नाही.

खरं आहे, कधी कधी आपण resourceful नसतो, त्यामुळे आपण जे शिकलो त्याचा सराव, वापर करू शकत नाही. पण तुम्हाला मनापासून इच्छा असल्यास तुम्ही पुन्हा नव्याने शिवणकला शिकू शकता. जसं मी पहिल्या ब्लॉग मध्ये लिहीलंय की शिवणकाम कोणत्याही वयात सुरू करु शकतो. सध्या शिकण्यासाठी अनेक साधनं उपलब्ध आहेत, तर नक्की विचार करा.

) मी घरी मशीन होतं.... म्हणून मी शिवण क्लास केला,पण नंतर सराव केला नाही.
खरं आहे, कधी कधी शालेय शिक्षण - कॉलेज शिक्षण - नोकरी - लग्न - संसार,ह्या सगळ्या मुळे आपली आवड आपल्या बाजूला ठेवावी लागते.
पण तुम्हाला मनापासून इच्छा असल्यास तुम्ही पुन्हा नव्याने शिवणकला शिकू शकता. आताही ती जुनी मशिन तुमच्या कडे असेल उत्तमच...!!!तर फक्त त्या मशिनची सर्व्हिसिंग करून घ्या. त्या मशिन वर जुने काही कपडे असल्यास सरळ शिलाई मारण्याचा सराव करा. व पुन्हा एकदा नव्याने सुरूवात करा. आता शिकण्यासाठी अनेक साधनं उपलब्ध आहेत. 


नमस्कार, मी मुग्धा राणे, Customized Stitching Expert and STITCHLINE for Independence ह्या platform ची संस्थापिका.

https://www.facebook.com/groups/2887049858214048/?ref=share
शिवणकलेवर आधारित व्यवसायात गेली २५ वर्ष आहे, STITCHLINE हा माझा ब्रॅण्ड आहे. ह्या ब्रॅण्ड अंतर्गत मी...नाईटिज, नाईट ड्रेस, कापडी पिशव्या, किचन एप्रन, लहान बाळांचे कपडे व इतर अनेक वस्तू ग्राहकांच्या मागणीनुसार तयार करून देते.


वरील पैकी तुम्ही कोणत्या गटात मोडता..?
आणि मी तुम्हाला शिवणकलेसाठी...काही मदत करू शकते का..?
 

तर मला संपर्क साधा... माझी whatsapp link देते आहे, त्यावर click केलात तर तुमचा माझ्याशी त्वरित संपर्क होऊ शकतो.
https://wa.me/message/DCYC6SEOONGQB1

YouTube वरून शिवणकला शिकतांना कोणती काळजी घ्यावी? ह्या संबंधी मी एक ब्लॉग लिहीणार आहे. 

सातत्याने STITCHLINE for independence चे blog वाचत रहा.
अजून कोणत्या विषयावर ब्लॉग लिहीणं आवश्यक आहे ते तुम्ही मला कमेंट मध्ये जरूर सांगा.

आभार..!!

मुग्धा राणे
Customized stitching expert and STITCHLINE for Independence ह्या
Platform ची संस्थापिका.












































टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लक्षात घ्या, घरी मेजरींग टेप ठेवण्याचे हे फायदे,....!!!