लक्षात घ्या, घरी मेजरींग टेप ठेवण्याचे हे फायदे,....!!!
नमस्कार मैत्रिणींनो...
सध्या ऑनलाईन चा जमाना आहे, आणि आपण बऱ्याच वस्तू , कपडे, घपला/बूट, अंतर्वस्त्रे , पडदे तर काही वेळेस टेबल/ खुर्ची सुद्धा ऑनलाईन मागवत असतो.
आता इथे कित्येकदा वस्तूंच्या मापांबद्धलची जी माहिती आपल्याला दिली जाते ती आपल्याला बुचकळ्यात पाडते.
उदा. कपडे...कपडे मागवतांना काही मापं इंचात दिलेली असतात तर काही वेळेस सेंटिमीटर मध्ये दिलेली असतात . पुरूषांच्या अंतर्वस्त्रांची मापं सेंटिमीटर मध्ये दिलेली असतात. जर आपल्याकडे मेजरिंग टेप असेल तर हे काम आपल्या साठी सोपं होईल. पडदे मागवतांनांही कधी इंचात मापं असतात तर कधी फूटात ( १२ इंच=१ फूट) तर अश्या कामासाठी मेजरिंग टेप असेल तर काम सोपं होतं.
लॉक डाउन च्या दरम्यान , माझ्या अनेक ग्राहकांनी नाईटीज शिवून घेतले. प्रत्यक्ष भेट तर शक्य नव्हती पण तरीही माझ्या नेहमीच्या ग्राहक मैत्रिणींनां मी सेवा देऊ शकले कारण त्यांची मापं माझ्याकडे होती. आणि काही नवीन ग्राहकांनांही मी माझी सेवा देऊ शकले , कारण त्यांच्या कडे मेजरींग टेप होती आणि त्या मला विडीओ कॉल द्वारे किंवा व्हॉट्स ॲप द्वारे मापं देऊ शकल्या.
अलीकडेच एका परदेशस्थ भारतीय ग्राहकांना मी माझी सेवा देऊ शकले , कारण त्यांनी मला व्यवस्थित मापं व्हॉट्स ॲप द्वारे पाठवली.
काय पटतंय का मी काय म्हणतेय ते..?
माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करुन सांगा. तुमच्या मित्र-मैत्रिणींशी शेअर करा, कदाचित त्यांनाही ह्या माहिती चा उपयोग होईल.
तुम्ही जर फेसबुक वर असाल, तर STITCHLINE बद्दल जास्त जाणून घेण्यासाठी ,पेज ला भेट द्या.
लिंक दिली आहे
https://www.facebook.com/rmugd/
STITCHLINE whatsapp number link
https://wa.me/message/DCYC6SEOONGQB1
जर तुम्ही फेस बुक युजर असाल ,तर STITCHLINE for independence हा ग्रुप जॉईन करा.
हा शिवणकला/ शिवणकाम(#sewing_marathi) ह्या विषयाला वाहिलेला ग्रुप आहे.जिथे आपण सातत्याने शिवणकला, शिवणकाम ह्यावर सतत सखोल चर्चा करत राहू, एकमेकींना मदत करत राहू. लिंक देते आहे.
https://www.facebook.com/groups/2887049858214048/?ref=share
Thank you.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा