जलद गतीने शिवणकाम करण्यासाठी जाणून घ्या ह्या सहा टिप्स....!!!
जलद गतीने शिवणकाम करण्यासाठी जाणून घ्या ह्या सहा टिप्स...!!
# १कापड बेतण्यासाठी एक वेगळं टेबल ठेवा.
कापड बेतण्यासाठी एक खास वेगळं टेबल असणं आवश्यक आहे. मी डायनिंग टेबल चा वापर करते, ज्याची लांबी ५५इंच आहे व रुंदी ३५ इंच आहे. मला नाईटिज् कापण्यासाठी ३ मिटर कापड पसरून घ्यावं लागतं,त्या साठी हे टेबल पुरेसं होतं, आणि जेवढं कापड नाईटिज साठी लागतं, तेवढंच कूर्तीज् साठी पण लागतं, म्हणून सर्वसाधारणपणे , मी सांगितलेल्या आकाराचे टेबल उपयुक्त ठरतं.
तसं तर, तुम्ही जमिनीवर कापड पसरून पण ड्रेस कापू शकता, पण ते लहान ड्रेस , बेबी फ्रॉक वगैरे साठी ठिक
वाटतं...पण कूर्तीज्, नाईटिज साठी अडचणीचं किंवा थकवणारं ठरतं, व वेळ आणि शक्ती जास्त खर्च होते.
# २ग्राहकांच्या मापांसाठी एक Index असणारं रजिस्टर ठेवा.
ग्राहकाचं नांव, फोन नंबर, व मापं लिहीण्यासाठी एक वेगळं रजिस्टर ठेवा. मी, Index असलेले रजिस्टर वापरते. हे कुठल्याही स्टेशनरी घ्या दुकानात तुम्हाला मिळेल. ह्या रजिस्टर ला सुरवातीला इंग्रजी आद्याक्षरे
( Alphabets) असलेली काही पानं असतात व पुढे नेहमी सारखी पानं असतात. तुम्ही तारखेप्रमाणे ग्राहकांची नावं , फोन नंबर व मापं लिहीत जा व काही ठराविक दिवासांनी ती नांव Index मध्ये लिहा. ह्याला मी Index ... update करणं म्हणते. मी काय सांगतेय ते आता कदाचित तुम्हाला कळणार नाही, पण प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही Index Register पहाल, वापराल तेव्हा तुम्हाला ते कळून येईल.
"प्रत्येक वस्तू साठी एक जागा, व त्या जागेवर ती वस्तू" हा वेळ वाचवण्याच्या अनेक मंत्रांपैकी एक मंत्र आहे.
नाही तर , कामासाठी लागणारं साहित्य शोधण्यासाठी खुप वेळ व उर्जा खर्च होते. ह्या साठी , प्रत्येक काम संपल्यावर , त्या वस्तू योग्य जागी ठेवण्याची सवय लावून घ्यावी लागते. त्याचप्रमाणे शिवणकामाशी संबंधित इतर वस्तू , जसं की, रिळं, बॉबिन्स, मशिनशी संबंधित असणारे स्क्रु ड्रायव्हर्स, मशिन तेलाची बाटली, मशिन रोज पुसण्यासाठीचा रूमाल, मशिनच्या सुया, बटणं इत्यादी....प्रत्येक वस्तू साठी जागा निश्चित केलेल्या असाव्यात, व त्या जागीच त्या वस्तू ठेवण्याची सवय ठेवा. त्यामुळे वस्तू चटकन् सापडतात व काम लवकर पूर्ण होतं.
# ४फोन सायलेंट वर ठेवा.
प्रत्यक्ष काम करताना येणाऱ्या अडचणींचा विचार करता,सतत वाजणारा फोन हा एक अडसर ठरू शकतो. म्हणून फोन सायलेंट वर ठेवा , पण हे करत असताना दर एक किंवा दिड तासांनी, किंवा तुम्ही हातात घेतलेलं काम पूर्ण झाल्यानंतर फोन चेक करा.
मी मात्र , ग्राहकांनी मला फोन करण्यासाठी, दिवसभरात दोन विशिष्ट वेळा ठरवून ठेवल्या आहेत,
व ग्राहकांना त्याची आठवण, मी मध्ये मध्ये करून देत असते.
![]() |
| focus on what is importent |
नमस्कार, मी मुग्धा राणे, Customized Stitching Expert and STITCHLINE for Independence ह्या platform ची संस्थापिका.येत्या ३ वर्षात दहा हजार महिलांना त्यांच्या फॅशन ब्रॅण्ड ची निर्मिती करून त्यांनां आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देणे हा माझा ध्यास आहे.
https://www.facebook.com/groups/2887049858214048/?ref=share
शिवणकलेवर आधारित व्यवसायात गेली २५ वर्ष आहे, STITCHLINE हा माझा ब्रॅण्ड आहे. ह्या ब्रॅण्ड अंतर्गत मी...नाईटिज, नाईट ड्रेस, कापडी पिशव्या, किचन एप्रन, लहान बाळांचे कपडे व इतर अनेक वस्तू ग्राहकांच्या मागणीनुसार तयार करून देते.
STITCHLINE ह्या माझ्या फेसबुक पेज ची link देते आहे , तिथे तुम्ही माझं काम पाहू शकता.
https://www.facebook.com/rmugd/0
#५ प्रत्यक्ष काम सुरू करण्यापूर्वी किमान पाच ते पंधरा मिनिटे शांत बसा व मेडिटेशन करा.
कोणतेही काम जलद गतीने होण्यासाठी , एकाग्रता
( Focus) खुप आवश्यक आहे. ते साध्य करण्यासाठी , काम सुरू करण्यापूर्वी किमान पाच ते पंधरा मिनिटे शांत बसा. आधी मनातले इतर विचार दूर करून,जे काम करायचं आहे, त्याच्या कृती ( process)वर व फक्त त्या बाबतच्या विचारांवर लक्ष केंद्रित करा. अगदी तुम्ही एकाच प्रकारचं काम रोज करत असाल, तरीही हे कराच...!!
हे सगळं करतांना नेमक्या त्या कामाच्या कोणत्या विशिष्ट (process) भागावर लक्ष केंद्रित करणं अत्यावश्यक आहे त्याचा विचार करा..हे करताना त्या कामाशी संबंधित ग्राहकाने काही वेगळ्या सूचना दिल्या होत्या किंवा काही बदल सांगितले आहेत का हे ही तुमच्या लक्षात येईल. कारण , ह्याबद्दल तुम्ही रजिस्टर मध्ये जरी लिहीलं असेल तरी ते काही वेळा दुर्लक्षित होऊ शकतं व नंतर कामात काही दुरुस्ती करावी लागून वेळ वाया जाऊ शकतो.
हे टाळण्यासाठी प्रत्यक्ष काम सुरू करण्यापूर्वी मेडिटेशन जरूर करा.
# ६प्रत्येक कामासाठी लागणाऱ्या खर्चाची व वेळेची नोंद ठेवा.
प्रत्येक काम करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किंमती व ते काम पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या वेळेची नोंद ठेवा. त्या कामासाठीची शिलाई ( charges) ठरवण्यासाठी त्याचा तुम्हाला उपयोग होईल.ह्या बाबत आणखी सविस्तर माहिती नंतर लिहीणार आहे, त्यासाठी माझे ब्लॉग सातत्याने वाचत रहा आणि तुमचे अभिप्राय मला कळवत रहा. तुमच्या काही अडचणी - प्रश्न असतील तर मला संपर्क साधा.
माझ्या whatsapp नंबर ची link देते आहे.
ह्यावर click केल्यावर तुमचा माझ्याशी त्वरित संपर्क होईल.
https://wa.me/message/DCYC6SEOONGQB1
आभार ...!!
मुग्धा राणे
Customized stitching expert and STITCHLINE for Independence ह्या platform ची संस्थापिका.
_____________________________________________




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा