कधी सुरू करता शिवणकला?
गेली अनेक वर्षे मी शिवणकलेवर आधारित व्यवसायात आहे. त्या निमित्ताने मी अनेक स्त्रियांनां भेटत असते. तर आज जाणून घेऊयात माझ्या संपर्कात आलेल्या ह्या माझ्या नानाविध मैत्रिणींची शिवणकला- शिवण काम ह्या बाबत ची मतं..
१) माझी आई उत्कृष्ट शिवणकाम करत असे आणि आमचे ..माझे व माझ्या बहीणीचे फ्रॉक, पंजाबी ड्रेस, घरचे पडदे वगैरे.. तीच शिवत असे, त्यामुळे मी कधीच शिवणकाम केलं नाही...पण आता वाटतं की शिकायला हवंय..
२) मी पण शिवण क्लास केलाय... पण घरी मशीन नव्हतं , म्हणून पुढे काही करता आलं नाही.
३) मी घरी मशीन होतं.... म्हणून मी शिवण क्लास केला,पण नंतर सराव केला नाही.
४) मी दहा वर्षे ब्लाऊज शिवले , शिवणकाम केलं , पण आता पैशांची गरज नाही, म्हणून शिवणकाम करत नाही.
५) मी अनेक वर्षे शिवणकाम केलं , स्वतःसाठी पैसे कमावले , बचत केली, पर्यटनाची हौस पण भागवली...पण आता घरच्यांची परवानगी नाही म्हणून शिवणकाम करत नाही.
६) मला शिवणकाम करायला आवडत होतं, मी नातेवाईकांना , बारश्याला ... सुंदर बाळंत विडे तयार करून दिलेत, पण आता माझ्या नातवंडांसाठी ते करायला मला जमत नाही, कारण थकायला होतं...
७) माझा लहान पणापासून शिवणकलेकडे ओढा होता, पण पालकांनी मला शिवणकलेपासून परावृत्त केलं, त्या पेक्षा महाविद्यालयीन शिक्षण चांगल्याप्रकारे पूर्ण करण्याकडे लक्ष दे असं सांगितलं.... त्यामुळे आधी शिक्षण मग नोकरी, लग्न , संसाराच्या जबाबदाऱ्या,ह्या मुळे माझी आवड दुर्लक्षित राहीली.
८) मी अनेक वर्षे शिवणकाम करत होते, आधी चाळीत रहात होते, तीथे अनेक ग्राहक होते, पण आता बिल्डिंग मध्ये रहायला आलो, इथे पाहीजेत तेवढे ग्राहक मिळाले नाही, त्या मुळे काम करणं बंद केलं.
९) मी काही वर्षांपूर्वी शिवणकाम करत होते, पण नंतर ग्राहकांच्या तक्रारी, कटकटीनां कंटाळून काम करणं बंद केलं.
१०) लहानपणापासूनच , मला शिवणकाम करायला अजिबात आवडत नसे, अगदी सुईत दोरा सुद्धा ओवायला मी शिकले नाही...पण आता वाटतं , की थोडं फार तरी शिकून घ्यायला हवं होतं, स्वयंपाक करणं, वाहन चालवणं , बॅंकेचे व्यवहार सांभाळणं, ही जशी जिवनावश्यक कौशल्यं आहेत, तसंच शिवणकाम करता येणं हे सुद्धा एक जिवनावश्यक कौशल्य आहे....आणी एक स्वावलंबी व्यक्ती होण्यासाठी तरी , बटणं ,हुक शिवणं, इलॅस्टिक बदलणं, मशिन वर सरळ शिलाई मारता येणं ....इतपत शिवणकाम मला यायला हवं..असं आता मला वयाच्या पन्नाशीत आल्यावर वाटतंय...!!!
नमस्कार, मी मुग्धा राणे, Customized Stitching Expert and STITCHLINE for Independence ह्या platform ची संस्थापिका.
https://www.facebook.com/groups/2887049858214048/?ref=share
शिवणकलेवर आधारित व्यवसायात गेली २५ वर्ष आहे, STITCHLINE हा माझा ब्रॅण्ड आहे. ह्या ब्रॅण्ड अंतर्गत मी...नाईटिज, नाईट ड्रेस, कापडी पिशव्या, किचन एप्रन, लहान बाळांचे कपडे व इतर अनेक वस्तू ग्राहकांच्या मागणीनुसार तयार करून देते.
वरील पैकी तुम्ही कोणत्या गटात मोडता..?
आणि मी तुम्हाला शिवणकलेसाठी...काही मदत करू शकते का..? तर मला संपर्क साधा... माझी whatsapp link देते आहे, त्यावर click केलात तर तुमचा माझ्याशी त्वरित संपर्क होऊ शकतो.
https://wa.me/message/DCYC6SEOONGQB1
मी वर लिहिलेल्या प्रत्येक गटातील मैत्रिणींना निश्चित मदत करू शकते.
STITCHLINE ह्या माझ्या फेसबुक पेज ची link देते आहे , तिथे तुम्ही माझं काम पाहू शकता.
https://www.facebook.com/rmugd/0
शिवणकाम तर वयाच्या कोणत्याही टप्प्यावर सुरू करता येते...माझं मत तर असं आहे..की .. प्रौढ वयात शिवणकाम अधिक चांगल्या प्रकारे करता येतं, कारण तोपर्यंत एक प्रकारचा "ठहराव" , संयम आपल्यात आलेला असतो, जो शिवणकला शिकण्यासाठी , हाती घेतलं काम पूर्ण करण्यासाठी अतिशय आवश्यक असतो... तसंच संसाराच्या काही जबाबदाऱ्या पूर्ण झाल्यानंतर आता इतरांसाठी नाही, तर स्वतःच्या समाधानासाठी, तुमचा हरवलेला उत्साह परत मिळविण्यासाठी... तुम्ही शिवणकाम परत सुरू करू शकता..!!
आभार..!!
मुग्धा राणे
Customized stitching expert and STITCHLINE for Independence ह्या
Platform ची संस्थापिका.




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा