"कधी सुरू करताय शिवणकला - भाग २"
नमस्कार मैत्रिणींनो, तुम्ही माझा.." कधी सुरू करता शिवणकला?" हा आधीचा ब्लॉग
वाचलाय का?
नसेल तर लिंक देते आहे.
https://mugdharane.blogspot.com/2022/07/blog-post.html
"कधी सुरू करता शिवणकला?"
ह्या ब्लॉग मध्ये मी, शिवणकला मध्येच सोडून देण्या बाबतची, दहा कारणं सांगितली
आहेत..जी माझ्या काही ग्राहक मैत्रिणींनीं माझ्या सोबत शेअर केली होती.
त्यातील ३
कारणं खाली देतोय..
१)माझी आई उत्कृष्ट शिवणकाम करत असे आणि आमचे ..माझे व माझ्या
बहीणीचे फ्रॉक, पंजाबी ड्रेस, घरचे पडदे वगैरे.. तीच शिवत असे, त्यामुळे मी कधीच
शिवणकाम केलं नाही...पण आता वाटतं की शिकायला हवंय..
७) माझा लहान पणापासून
शिवणकलेकडे ओढा होता, पण पालकांनी मला शिवणकलेपासून परावृत्त केलं, त्या पेक्षा
महाविद्यालयीन शिक्षण चांगल्याप्रकारे पूर्ण करण्याकडे लक्ष दे असं सांगितलं....
त्यामुळे आधी शिक्षण मग नोकरी, लग्न , संसाराच्या जबाबदाऱ्या,ह्या मुळे माझी आवड
दुर्लक्षित राहीली.
१०) लहानपणापासूनच , मला शिवणकाम करायला अजिबात आवडत नसे, अगदी
सुईत दोरा सुद्धा ओवायला मी शिकले नाही...पण आता वाटतं , की थोडं फार तरी शिकून
घ्यायला हवं होतं, स्वयंपाक करणं, वाहन चालवणं , बॅंकेचे व्यवहार सांभाळणं, ही जशी
जिवनावश्यक कौशल्यं आहेत, तसंच शिवणकाम करता येणं हे सुद्धा एक जिवनावश्यक कौशल्य
आहे....आणी एक स्वावलंबी व्यक्ती होण्यासाठी तरी , बटणं ,हुक शिवणं, इलॅस्टिक
बदलणं, मशिन वर सरळ शिलाई मारता येणं इतपत शिवणकाम मला यायला हवं..असं आता मला
वयाच्या पन्नाशीत आल्यावर वाटतंय.
आज आपण वरच्या मुद्द्यांवर बोलू..
नमस्कार मी
मुग्धा राणे, शिवणकलेवर आधारित व्यवसायात आहे. STITCHLINE हा माझा ब्रॅण्ड आहे ह्या
ब्रॅण्ड अंतर्गत मी नाईटिज नाईट ड्रेस कापडी पिशव्या किचन एप्रन लहान बाळांचे कपडे
व इतर अनेक वस्तू ग्राहकांच्या मागणीनुसार तयार करून देते.
STITCHLINE for
Independence, हा माझा FB group आहे. आणि येत्या तीन वर्षात दहा हजार महिलांना
त्यांच्या फॅशन ब्रॅण्ड ची निर्मिती करून त्यांनां आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देणे
हा माझा ध्यास आहे.
FB Group ची link देते आहे.
https://www.facebook.com/groups/2887049858214048/?ref=share
शिकण्याची इच्छा
असेल, तर कुठल्याही वयात तुम्ही एखाद्या विषय शिकायला सुरुवात करु शकता. आणि
शिवणकला ही अशी कला आहे, जी आपण प्रौढ वयात जास्त लवकर शीकू शकतो, कारण तोपर्यंत एक
प्रकारचा संयम आपल्या ठायी निर्माण झालेला असतो.
खरं म्हणजे , शिवणकला हे एक skill आहे, आणि "your skills will pay your bills"
म्हणजेच तुम्ही मिळवलेली कौशल्य तुम्हाला धन प्राप्तीसाठी उपयोगी ठरतात..नक्कीच ,
कारण तुम्ही जितके कौशल्य स्वतः मध्ये विकसित करता तेवढ्या स्वावलंबी होण्यासाठी
च्या शक्यता तुमच्या साठी खुल्या होतात. जेवढी स्वतः मधील कौशल्य आपण अधिकाधिक
विकसित करत जातो तेवढा आपला आत्मविश्वास वाढतो.
आत्मविश्वास कोणत्याही क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्यासाठी महत्त्वाचा असतो. उत्तम
कामगिरी मुळे तुम्हाला प्रसिद्धी मिळते आणि कामं तुमच्या कडे आपोआप चालत येतात...
त्यामुळे त्या कामाचे पैसेही तुम्हाला मिळतात. म्हणूनच शिवणकलेसारखं कौशल्य विकसित
करणं खरंच फायदेशीर ठरते.
चला तर मग, तुमचं वय , शिक्षण काहीही असो , जर तुम्हाला
आवड असेल, तर शिवणकला शिकायला सुरुवात करा आणि आवड जरी नसली , तरी शिकायला
सुरुवात केल्यानंतर कदाचित आवड निर्माण होऊ शकते. जसं की , तुम्ही उशिरा सुरु
केलेल्या काही गोष्टी आता तुमच्या अंगवळणी पडल्यात ( स्वयंपाक करणं, वाहन चालवणं,
तंत्रज्ञानाचा वापर करणं वगैरे.)
तर मग , शिवणकाम शिकायला लवकर सुरूवात करा.
तुमच्या काही अडचणी, प्रश्न असतील तर मला , माझ्या FB page वरुन नक्की संपर्क करा.
FB page ची link देते आहे. https://www.facebook.com/rmugd/
मुग्धा राणे.
Customized stitching expert and STITCHLINE for Independence , ह्या platform ची
संस्थापिका.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा