शिवणकलेचं महत्व
नमस्कार मैत्रिणींनो...आपण लहानपणापासून अनेक छंद जोपासत असतो. मोठं होण्याच्या प्रोसेस मध्ये आपले काही छंद हातून नकळत निसटून जातात. जसं की वाचन करणं, कविता करणं, गाणी गाणं , रांगोळी काढणं , मेंदी रेखाटन, विणकाम , फुलांचे हार तयार करणं , इत्यादी.
काही जिवनोपयोगी छंद आपल्याला जाणिवपूर्वक शिकवले जातात आणि त्यासाठी आपल्याला प्रोत्साहन ही दिलं जातं...जसं की स्वयंपाक करणं,शिवणकला (#sewing_marathi),भरतकाम, रांगोळी काढणं, विणकाम इत्यादी.. आणि कधी कधी तर आपण त्यात
छान पैकी रमतोही...!!
तर मैत्रिणींनो शिवणकला हा अश्याच अनेक छंदा पैकी एक महत्त्वाचा छंद.... जाणून घेऊया शिवणकलेचं महत्व....!!
तुम्ही जर शिवणकलेची( #sewing_marathi) आवड जोपासत असाल तर तुम्ही पैसै व वेळ दोन्ही वाचवू शकता.
आजकाल रेडीमेड चा जमाना आहे. औद्यौगिकरणामुळे भरपूर प्रमाणात तयार कपडे उपलब्ध असतात.आणि मोठमोठ्या मॉल, डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये वर्षभरात साधारण तीन वेळा वेगवेगळ्या कारणांसाठी सेल लावले जातात. अश्या प्रसंगी उत्तमोत्तम , आपल्याला आवडतील असे तयार कपडे , बऱ्यापैकी कमी किंमतीत उपलब्ध असतात. आणि मग अनोखं प्रिंट, पोत आणि रंगसंगती असलेले तयार कपडे , ते जरी थोडे लांबीला जास्त असले, आपल्या मापा पेक्षा सैल असले , गळा किंचीत मोठा असला तरी आपण ते विकत घेतो. नंतर प्रत्यक्ष वापरण्याची वेळ येते , तेव्हा आपल्याला दुरुस्तीची गरज भासते. आणि हे काम करण्यासाठी कोणतेही पारंगत टेलर नकार देतात किंवा फार जास्त पैसे आकारतात.
अश्या वेळेस, तुम्हाला जर शिवणकलेत(#sewing_marathi) रस असेल, तुम्हाला शिवण मशिन चा योग्य वापर करता येत असेल तर येन केन प्रकारे... तुम्ही ती दुरुस्ती करताच ... त्यामुळे तीन गोष्टी साध्य होतात. एक तर तुम्ही काही गोष्टी शिकुन घेता, इतर ठिकाणी जाण्याचा तुमचा वेळ वाचतो आणि दुरूस्ती साठी देण्याचे पैसे ही वाचतात.
एक काम पूर्ण केल्याचा आनंद घेता येतो.त्यामुळे आत्मविश्वास वाढतो. मित्र- मैत्रिणी कडून तुमची स्तुती केली जाते. त्याचा आणखी एक वेगळाच आनंद मिळतो.
शिवणकलेत(#sewing_marathi) पारंगत असल्यामुळे , तुम्ही मित्र-मैत्रिणी , नातेवाईक ह्यांना अनोख्या ( unique) भेटवस्तू तयार करून देऊ शकता आणि त्या मुळे तुम्ही दिर्घकाळ त्यांच्या स्मरणात रहाता.
तर मग मला comment मध्ये नक्की सांगा.
जर तुम्ही फेस बुक युजर असाल ,तर STITCHLINE for independence हा ग्रुप जॉईन करा.
हा शिवणकला/ शिवणकाम(#sewing_marathi) ह्या विषयाला वाहिलेला ग्रुप आहे.जिथे आपण सातत्याने शिवणकला, शिवणकाम ह्यावर सतत सखोल चर्चा करत राहू, एकमेकींना मदत करत राहू. लिंक देते आहे.
https://www.facebook.com/groups/2887049858214048/?ref=share
तर मग मला comment मध्ये नक्की सांगा.
जर तुम्ही फेस बुक युजर असाल ,तर STITCHLINE for independence हा ग्रुप जॉईन करा.
हा शिवणकला/ शिवणकाम(#sewing_marathi) ह्या विषयाला वाहिलेला ग्रुप आहे.जिथे आपण सातत्याने शिवणकला, शिवणकाम ह्यावर सतत सखोल चर्चा करत राहू, एकमेकींना मदत करत राहू. लिंक देते आहे.
https://www.facebook.com/groups/2887049858214048/?ref=share
माझा हा ब्लॉग शेवट पर्यंत वाचल्या बद्दल तुमचे आभार...!!
ब्लॉग आवडला तर लाईक आणि कमेंट नक्की करा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा