कधी सुरू करता शिवणकला -भाग ३
नमस्कार मैत्रिणींनो ,"कधी सुरू करता शिवणकला?" ह्याचे आधी चे दोन भाग तुम्ही वाचले असतील. जर नसेल तर पुन्हा एकदा लिंक देते आहे.
https://mugdharane.blogspot.com/2022/08/blog-post_9.html
https://mugdharane.blogspot.com/2022/07/blog-post.html
आता , माझ्या काही मैत्रिणींना शिवणकाम करण्यासाठी आणखी कोणते अडथळे येतात, ते पाहू..
४) मी दहा वर्षे ब्लाऊज शिवले , शिवणकाम केलं , पण आता पैशांची गरज नाही, म्हणून शिवणकाम करत नाही .
मान्य आहे, गरज नाही, पण मोठ्या मेहनतीने कमावलेलं हे कौशल्य, न वापरल्याने सराव न केल्याने ते कौशल्य वापरण्याचा तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. आणि गरज नेहमी पैशाचीच असते, असं नाही, तर कधी कधी एखादं छोटंसं पण "आत्ताच्या आत्ता" करण्याजोगे काम अडून राहु शकतं.
५) मी अनेक वर्षे शिवणकाम केलं , स्वतःसाठी पैसे कमावले , बचत केली, पर्यटनाची हौस पण भागवली...पण आता घरच्यांची परवानगी नाही म्हणून शिवणकाम करत नाही.
घरच्यांची परवानगी योग्य संवादातून मीळवता येऊ शकते. तसंच मोजकेच काही , वेगळ्या प्रकारचे, कलात्मक काम करण्याचं ठरवून ते करू शकता.
ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल.
६) मला शिवणकाम करायला आवडत होतं, मी नातेवाईकांना , बारश्याला ... सुंदर बाळंत विडे तयार करून दिलेत, पण आता माझ्या नातवंडांसाठी ते करायला मला जमत नाही, कारण थकायला होतं...
इथं तुम्हाला तुमची बसण्याची व्यवस्था तपासून घ्यायला हवी. तुम्ही जर स्टुल घेऊन बसत असाल, तर तुम्ही लवकर दमून जाल. पण जर तुम्ही योग्य उंचीची खुर्ची वापरा ज्या मुळे काम करणं आरामदायी होईल.
तसंच मशिन वर काम करण्यासाठी पुरेसा उजेड आहे का ते पहा. अपुऱ्या उजेडात काम करताना दमछाक होऊ शकते.
मशिन चालवण्यासाठी, मोटार वापरत असाल तर उत्तम, पण जर नसाल तर ते शिकून घ्या व वापरा.
काम जलद गतीने पूर्ण झाल्याचं तुम्हाला जाणवेल.
८)मी अनेक वर्षे शिवणकाम करत होते, आधी चाळीत रहात होते, तिथे अनेक ग्राहक होते, पण आता बिल्डिंग मध्ये रहायला आलो, इथे पाहीजेत तेवढे ग्राहक मिळाले नाही, त्या मुळे काम करणं बंद केलं.
इथे तुम्हाला स्वतःला पुढाकार घेऊन , काही खास प्रयत्न करावे लागतील. जसं की तुमच्या परिसरात होणाऱ्या सार्वजनिक समारंभात सहभागी व्हा. जेव्हा संधी मिळेल तेव्हा स्वतःबद्दल बोला, तुमच्या कामाच्या अनुभवाबद्दल सांगा.
तुमचा फोन इथं तुम्हाला मदत करू शकतो. तुम्ही स्वतःसाठी शिवलेल्या ड्रेस/ ब्लाऊज व्यवस्थित काढलेला फोटो , तुम्ही स्टेटस/स्टोरी ला ठेवू शकता.
उत्तम पद्धतीने करुन दिलेलं एक काम तुम्हाला माऊथ पब्लिसिटी द्वारे तुमच्या संभाव्य ग्राहकांपर्यंत घेऊन जाऊ शकतं.
९) मी काही वर्षांपूर्वी शिवणकाम करत होते, पण नंतर ग्राहकांच्या तक्रारी, कटकटीनां कंटाळून काम करणं बंद केलं.
"ग्राहक" हे कोणत्याही व्यवसायाचा कणा असतो, त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारींची डोळसपणे दखल घ्या. शिवणकामचा एखादा भाग तुम्हाला कळला नसण्याची शक्यता असु शकते.
थोडक्यात तुम्हाला तुमची गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणं गरजेचं असु शकतं. त्यासाठी तुम्हाला काही नवं शिकणं आवश्यक असु शकतं, त्याचा शोध घ्या.
ह्यामुळे तुम्ही एक उत्कृष्ट व्यवसायीक बनाल, त्याचा परिणाम म्हणून तुमची आर्थिक आवक नक्की वाढेल.
शिवणकाम करतांना आपल्या ग्राहकांना कसं हाताळायचं ह्या बद्दल मी एक ब्लॉग लिहीणार आहे.माझे ब्लॉग सातत्याने वाचत रहा.
नमस्कार, मी मुग्धा राणे, Customized Stitching Expert and STITCHLINE for Independence ह्या platform ची संस्थापिका.
https://www.facebook.com/groups/2887049858214048/?ref=share
शिवणकलेवर आधारित व्यवसायात गेली २५ वर्ष आहे, STITCHLINE हा माझा ब्रॅण्ड आहे. ह्या ब्रॅण्ड अंतर्गत मी...नाईटिज, नाईट ड्रेस, कापडी पिशव्या, किचन एप्रन, लहान बाळांचे कपडे व इतर अनेक वस्तू ग्राहकांच्या मागणीनुसार तयार करून देते.
वरील पैकी तुम्ही कोणत्या गटात मोडता..?
आणि मी तुम्हाला शिवणकलेसाठी...काही मदत करू शकते का..? तर मला संपर्क साधा... माझी whatsapp link देते आहे, त्यावर click केलात तर तुमचा माझ्याशी त्वरित संपर्क होऊ शकतो.
https://wa.me/message/DCYC6SEOONGQB1
मी वर लिहिलेल्या प्रत्येक गटातील मैत्रिणींना निश्चित मदत करू शकते.
STITCHLINE ह्या माझ्या फेसबुक पेज ची link देते आहे , तिथे तुम्ही माझं काम पाहू शकता.
https://www.facebook.com/rmugd/0
थोडक्यात काय तर जे तुम्हाला मनापासून करायचं आहे ते तुम्ही करता, ज्याची लोकांना गरजही आहे आणि ते तुम्हाला त्यासाठी पैसे द्यायला तयार आहेत , तर ती तुमची स्वतःची गोष्ट आहे आणि तुम्हीच त्या गोष्टीची नायिका आहात. म्हणूनच लहान लहान गोष्टींमुळे नाउमेद न होता काम करत रहा.
आभार..!!
मुग्धा राणे
Customized stitching expert and STITCHLINE for Independence ह्या Platform ची संस्थापिका.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा